Mumbai-Nashik highway : मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, खासदार बाळ्या मामा उतरले रस्त्यावर

 

Mumbai-Nashik highway traffic jam :  सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरही आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बाळ्या मामा रस्त्यावर उतरले. बाळ्या मामाने टोल प्रशासनाला धारेवर धरत वाहतूक सुरळीत केली. बाळ्या मामाचा वाहतूक सुरळीत करतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर सुद्धा वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना करावा लगत आहे. या महामार्गावरील पडघा येथील टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा फटका भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना सुद्धा बसला.

Thirty First Party : तळीरामांना बसणार चाप! दारू पिऊन गाडी चालवाल तर तुरुंगाची हवाही खाल

 
खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे रविवारी रात्री उशिरा शहापूर येथील कार्यक्रम आटपून भिवंडी येथील आपल्या घरी परतत होते. त्यांना सुद्धा टोल नाक्यावरील या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे.

टोल वसुलीसाठी टोल नाक्यावर वाहन थांबवून ठेवल्याने टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने झालेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा रविवारी रात्री पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. खासदार बाळ्या मामा यांनी टोल प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका केली. खासदार बाळ्या मामा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून खासदारांच्या या कामाची अनेकांनी प्रशंसा केली आहे. याआधी देखील भिवंडीतील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी खासदार बाळ्या मामा रस्त्यावर उतरले होते.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply