Mumbai-Nashik Highway : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, २ जण जखमी

Mumbai-Nashik Highway : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झालेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील ड्रीम हॉटेल जवळ ही घटना घडली आहे. एका चारचाकीने काही तरुण भरधाव वेगाने समोर येत होते. त्यावेळी अचानक वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी महामार्गालगत असलेल्या टेकडीवर जावून आदळली.

Narendra Modi News : मोदींना शिव्या देणं हाच काँग्रेसचा अजेंडा; विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधान कडाडले

अपघातावेळी कार फार वेगात होती. त्यामुळे जागीच दोघांचा मृत्यू झाला. रवी शिवराम धापटे आणि पप्पू शिवराम भला (राहाणार शिरोळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वप्निल गावंडे व रवी बागडे हे गंभीर जखमी झाले असून यांना उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply