Mumbai Metro Fare Hike : मुंबईकरांना झटका, मेट्रोच्या तिकिटात वाढ होणार!

Mumbai Metro Fare Hike : मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मेट्रोचा प्रवास आता महागणार आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ मार्गिकेच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएने या माग्रिकेवरील तिकीट दरांच्या सुधारणेसाठी दर निर्धारण समिती नेमण्याची सुरुवात केली आहे. ही समिती मेट्रोच्या तिकीटाचे दर निश्चित करेन.त्यानुसार प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.

ही समिती स्थापन झाल्यानंतर सर्व अभ्यास करेन.त्यानंतर तिकीट दर सुधारण्याबाबत निर्णय घेईल. यानंतर येत्या दीड-दोन वर्षात मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेच्या तिकीट दरात वाढ होऊ शकते.

मेट्रो २अ आणि ७ मार्गिका दोन वर्षांपासून सेवेत दाखल झाली आहे. या दोन्ही मार्गिकांचे संचलन एमएमएमओसीएलद्वारे केले जाते. या मार्गिकांमध्ये प्रवाशी चांगल्या संख्येने प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर झाला आहे.

मेट्रोचे तिकीट जास्त असले तरीही या मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. मात्र, अजूनही अपेक्षित प्रवासी या मेट्रोने प्रवास कपत नाही. या मार्गांवरुन दिवसाला ७० लाख प्रवासी प्रवास करतात. यापेक्षा जास्त प्रवाशांच अपेक्षा एमएमआरडीएला होती. त्यामुळे जास्त महसूल अपेक्षित आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे तिकीट दरात वाढ केली जाऊ शकते.

तिकीट कर सुधारण्यासाठी दर निर्धारण समिटी नेमण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर समिती स्थापन होईल. त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरु होईल, याबाबत महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दुजोरा दिला आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply