Mumbai Mega Block : रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कुठे, कधी, कसा? जाणून घ्या सविस्तर माहिती

Mumbai Mega Block : मुंबईत रविवारी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. रविवारी(ता.७)एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीने विविध अभियांत्रिकी कामे आणि देखभालीसाठी मेगाब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही विलंबाने धावणार आहेत.

मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बर रेल्वेच्या ठाणे ते वाशी मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेच्या मार्गावरही माहीम ते अंधेरीदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Pune Crime News : पुण्यात दुचाकी चाेरणा-या बाणेर, वाकड, थेरगावातील युवकांना अटक, 11 वाहनांसह रिक्षा जप्त

मध्य रेल्वे- मुख्य मार्ग

मार्ग- अप डाउन धीमा

कुठे- माटुंगा ते मुलुंड

वेळ- सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

या ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येईल.यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द तर काही रेल्वे फेऱ्या उशिराने धावणार आहेत.

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *