Mumbai Marathi Patya Update : मराठी पाट्यांसाठीची मुदत संपली, BMCकडून आजपासून कायदेशीर कारवाई होणार

 

Mumbai Marathi Patya Update : राज्यातील दुकाने तसेच आस्थापनांवर मराठी पाट्या बंधनकारक असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. मराठी पाट्या बसवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने तीन दिवस अधिक मुदत दिली होती. ही मुदत आज संपत असल्याने मुंबई महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरुन कारवाई करणार आहेत.

मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बैठक घेऊन सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत. 

Nashik News : नांदूरमध्यमेश्वरचे 2 गेट उघडले; 2 दिवस सुरू राहणार विसर्ग

मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर तसेच आस्थापनांवर आजपासून मुंबई महानगरपालिका  कारवाई करणार आहे. प्रत्येक आस्थापनेला दोन हजार रूपये दंड ठोठावला जाईल. तरी देखील पाट्या न बदलल्यास दुकानाचा परवाना देखील रद्द करण्यात येणार आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेतील पाट्या लावणे बंधनकारक आहे. त्‍यासाठी २४ विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील पथक गठीत करण्यात आले आहे. त्‍यांना कारवाईचे अधिकार देण्‍यात आले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील मराठी पाट्यांचा मुद्दा उचलला असून पाट्या न बदलल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. देवनागरी भाषेतील मराठी पाट्या बसवण्यासाठी २५ नोव्हेंबर ही तारीख सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली होती. मात्र तरीही काही दुकाने अशी आहे ज्यांनी अजूनही त्यांच्या पाट्या बदललेल्या नाहीत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply