Mumbai : पोलीस अधिकाऱ्यावर काळाचा घाला; ड्युटीवर जाताना बसच्या धडकेत मृत्यू

Mumbai : मुंबईतून एक दुखद वृत्त हाती आलं आहे. मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. प्रवीण दिनकर असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. पोलीस अधिकारी प्रवीण दिनकर हे सकाळी घरातून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे कामावर जाण्यासाठी निघाले होते.

मुंबईच्या वाकोला - सांताक्रुज परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसने दिलेल्या धडकेत ते रस्त्यावर कोसळून जखमी झाले. त्यांना महापालिकेच्या सांताक्रुज येथील व्ही एन देसाई रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

४६ वर्षीय प्रवीण दिनकर हे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पोलीस अधिकारी प्रवीण दिनकर यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply