Mumbai Local Train : लोकल गर्दी कमी होणार? राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल

Mumbai Local Train  : रेल्वे अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललयं. अशात मुंबईच्या लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारानं मोठा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेने लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवता येतील का? याबाबत सरकारी कार्यालयांना पत्राद्वारे विचारणा केली होती.

दरम्यान मध्य रेल्वेच्या पत्राची दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने एक जीआर काढून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलीय. ही समिती कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवता येतील का? याबाबत चाचपणी करेल आणि राज्य सरकारला शिफारस करेल.

मात्र अनेक सरकारी कार्यालये ही कामकाजासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. अशावेळी त्यांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवणे शक्य होईल असे वाटत नाही, असं कर्मचारी, अधिकारी संघटनांचे म्हणणे आहे... त्यामुळे समिती काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *