Mumbai Local : लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच, मुंबई हायकोर्टाने भरपाई देण्याचे दिले आदेश

Mumbai Local : मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकल ट्रेनमधून  प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे लोकल ट्रेनला प्रचंड गर्दी असते. गर्दीमुळे लोकलमधून पडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशामध्ये आता गर्दीमुळे लोकलमधून पडून झालेला मृत्यू हा अपघातच असल्याचे मुंबई हायकोर्टाने  स्पष्ट केले. तसंच, या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असून भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. गर्दीमुळे जर एखाद्याचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू होत असेल तर तो अपघातच असल्याचे म्हटले आहे. या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची भरपाई देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्याचसोबत तीन महिन्यात भरपाई दिली नाही तर १२ टक्के व्याजदराने रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा देखील कोर्टाने दिला आहे.

Chiplun Heavy Rain : भर उन्हाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; चिपळून, अडरे भागात नद्या झाल्या प्रवाहित

लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दोन महिन्यांमध्ये लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ११ मे रोजी लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला होता. कल्याणवरून सीएसएमटीकडे जलद लोकलने जात असताना ही घटना घडली. मुंब्रा- कळवा स्थानकादरम्यान पारसिक बोगद्याजवळ लोकलमध्ये पडून २८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला.

त्याआधी नातेवाईकांच्या घरी जाण्यासाठी आपल्या आईसोबत निघालेल्या तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान खांबाची धडक लागून हा तरुण लोकलमधून खाली पडला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान पाचव्या दिवशी मृत्यू झाला.

तर दुसरीकडे मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्या उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला होता. त्यापूर्वी डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचा देखील डोंबिवली -कोपर स्थानकादरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. ठाण्यामध्ये नोकरीसाठी जात असताना ही घटना घडली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply