Mumbai local : लोकल स्टेशनवर होणार महत्वाचे बदल, मनसेच्या मागणीला यश

Mumbai local : रेल्वे स्थानकाजवळील परिसरात फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी वाढल्याने दिवेकर त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी दिवा प्रभाग समितीकडे फेरीवाल्यांच्या तक्रारी करूनदेखील अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांवर आणि दिवा रेल्वे स्थानक परिसरात सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. या मागणीला महापालिका आयुक्तांच्या दिव्यातील दौऱ्यावेळी हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार आता दिवा स्थानक परिसरात सीसीटीव्हीद्वारे फेरीवाल्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Hunger Strike : नागरी सुविधांसाठी तळेगावकरांचे उद्यापासून उपोषण

यासंदर्भात नागरिकांकडून ठाणे महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनदेखील योग्य प्रतिसाद मिळत नाही. तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी फेरीवाल्यांकडून हप्तेवसुली करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतरदेखील दिवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. तसेच अनधिकृत वाहनांचे पार्किंग रिक्षांची गर्दी यामुळे वाट शोधण्यात दिवेकरांना दमछाक करावी लागत आहे.

त्यामुळे स्थानिक आमदार राजू पाटील यांनी परिसरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे. या मागणीला आयुक्तांनीदेखील हिरवा कंदील दिला आहे. स्मार्ट योजनेअंतर्गत सीसीटीव्ही बसवून परिसरावर नजर ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply