Mumbai Grant Road Fire : मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला भीषण आग, एकाचा मृत्यू

Mumbai Grant Road Fire : मुंबईच्या ग्रँट रोड  परिसरात भीषण आग लागली आहे. मध्यरात्री लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीचं कारण अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळण्याचे काम अजूनही सुरूच आहे.  एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून प्लॅटिनम मॉल आणि रहिवासी इमारती खाली करण्यात आल्या आहे. 16 अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम  युद्ध पातळीवर सुरू आहे.आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

या घटनेची माहिती मिळताच  16 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर ही आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले. लाकडाचे गोदाम या आगीत जळून खाक झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

Ahmednagar News : प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा आक्रोश; भाव नसल्याने मेथी, कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिली

नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील ग्रॅट रोड परिसरात लाकडाच्या गोदामास मध्यरात्री तीनच्या सुमारास लाकडाच्या गोदामाला आग लागली. लाकडाचे गोदाम असल्याने आग वेगाने पसरत गेली. तसेच या आगीच्या परिसरात एकच खळबळ माजली. दरम्यान ही आग लागल्यानंतर स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती कळवली. अग्निशमन दल, रुग्णवाहिका, कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबिरीला कवडीमोल किंमत

कोथिंबीरीला १ रुपये प्रति जुडी देखील भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये देखील कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याने वैतागून कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिली आहे. लागवडीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांना हे पाऊल उचलावं लागतंय. शेत पिकाला हमीभाव द्या अन्यथा गांजा लागवड करण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आक्रमक होत केली आहे.

साल २०२३ मध्ये हवा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अशात हिवाळ्यांच्या दिवसांत काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्यात. वारंवार होत असलेलं नुकसान पाहून शेतकरी चिंतेत आहे. त्यात आता मेथी आणि कोथिंबीरीचं पिक जास्त आहे. मात्र त्याला कवडीमोल भाव असल्याने शेतकऱ्यांनी राग व्यक्त केलाय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply