Mumbai Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात टँकरला आग

Mumbai Goa Highway Fire News: मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात टँकरला आग लागल्याची घटना घडली. कशेडी घाटात पोलादपूर हद्दीतील भोगाव गावाजवळ केमिकल टँकरला ही आग लागली असून सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी दोन्ही बाजूने एक किलोमीटरपर्यंत वाहने थांबवली होती.

Ambenali Ghat : आंबेनळी घाट 15 दिवस वाहतुकीसाठी बंद : जिल्हाधिका-यांचा आदेश

घटनास्थळी महाड एमआयडीसी अग्निशमन दल दाखल झाले असून त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझल्यानंतर आता वाहतुक सुरु करण्यात आली आहे. अपघातग्रस्त हा टँकर खोपोली येथून जयगडला चालला होता. सुदैवाने हा टँकर रिकामा असल्याने मोठा अनर्थ टळला आणि या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply