Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; होळीसाठी निघालेले चाकरमानी अर्ध्यातच अडकले , ४-५ किमी वाहनांच्या रांगा

Mumbai-Goa Highway : होळी सणासाठी चाकरमानी कोकणात निघाल्याने मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. इंदापूर ते माणगाव दरम्यान ४ ते ५ किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लाबं रांगा लागल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून प्रवाशी अर्ध्यातच अडकून पडले आहेत . महामार्ग चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालेलं नाही, त्याचा फटका चाकरमान्यांना बसला आहे. महामार्गावर छोट्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे गावी कधी पोहचायचं असा प्रश्न सणासाठी निघालेल्या चाकरमान्यांना पडला आहे.

सलग दोन तीन दिवसांची सुट्टी आणि होळीचा सण असल्याने शिमगोत्सव साजर करण्यासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात निघाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच होळीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने हाल होत आहेत. महामार्ग पोलीस ठिकठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून त्यांचेही प्रयत्न अपुरे पडत असताना दिसत आहेत.

Iqbal Singh Chahal : मोठी बातमी! इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

१२ वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं सुरू आहे काम

४४० किमाी मुंबई गोवा महामार्गाचं काम जवळपास १२ वर्षांपासून सुरू असून खर्च जवळपास दुप्पट झाला आहे. त्यातही ११२ किमीच्या रस्त्याचं काम २३ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली होती, मात्र मार्च संपत आला तरी काम पूर्ण झालेलं नाही. काम पूर्ण होण्यासाठी मे उजाडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या महामार्गावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आतापर्यंत 7,300 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात बोगदे, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, काँक्रिटीकरण केलेल्या चौपदरीकरणाव्यतिरिक्त सेवा मार्गांचाही समावेश आहे. ४४० किमीच्या महामार्गाला मंजूरी मिळाली त्यावेळी या सुमारे 3,500 ते 4,000 कोटीच्या निधीतून काम पूर्ण करण्यात येणार होतं. मात्र आता खर्च दुपटीपेक्षा जास्त वाढला आहे. तरीही मुदतीत काम पूर्ण होत नाही. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. कोकणातील चाकरमान्यांची संख्या मुंबईत मोठी आहे. कोकणात जाण्यासाठी हाच प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येक सणाला आणि सुट्ट्यांच्या काळात वाहतूक कोंडी ठरलेली असते.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply