Mumbai Crime : बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाचे अपहरण? आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai : व्यावसायिकाचे अपहरण करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेवर व्यावसायिकाचे अपहरण करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात राज सुर्वेसह १० जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Follow us -

संबंधित व्यावसायिकाने बंदुकीचा धाक दाखवून स्टॅम्प पेपरवर सही घेतल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणी तक्रार केल्यास खोट्या मनीलॉंड्रिंग केसमध्ये गोवण्याची धमकीही दिल्याचे व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत म्हणले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Pakistan National Assembly Dissolved : पाकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी! मध्यरात्री संसद बरखास्त; राष्ट्रपतींचा मोठा निर्णय

दरम्यान, आमदार प्रकाश सुर्वे हेव्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आले होते. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांच्यासोबतचा एक रॅलीमधील व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली होती. व्हिडिओ मॉर्फ असल्याचे शितल म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले होते. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply