Mumbai Crime : मुंबई विमानतळावर ४ कोटी रूपयांचं कोकेन जप्त; कस्टम विभागाची मोठी कारवाई

Mumbai : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ४.८३ कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलंय. कस्टम्स विभागाने ही कारवाई केलीय. केनियन नागरिकाकडून तब्बल ४८२.६६ ग्रॅम कोकेन जप्त केले आहेत. याप्रकरणी अदिस अबाबावरून आलेल्या प्रवाशाला अटक करण्यात आलीय. गुदद्वारात लपवून अमली पदार्थाची तस्करी सुरू होती. अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत केनियन नागरिकाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

मुंबई कस्टम्सने १५ -१६ ऑगस्ट रोजी रात्री मुंबई विमानतळावर मोठ्या कारवाईत ४८२.६६ ग्रॅम कोकेन जप्त केले. या कोकेनची बाजारातील किंमत ४ कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. केनियन नागरिकाच्या गुदद्वारात हा अमली पदार्थ सापडला होता. या घटनेमुळे मुंबई विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती.

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी तरणाला RTO कडून धडे

या प्रवाशाची केनियातील काकामेगा येथील रहिवासी असल्याची ओळख पटली आहे. मुंबई कस्टम्सने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, केनियन नागरिक आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्याफ्लाइटने मुंबईत आले होते. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयाने एका केनियन नागरिकाला अमली पदार्थांसह अटक केलीय. कस्टम अधिकाऱ्यांनी पांढरी पावडर असलेली सात कॅप्सूल जप्त केली होती. नंतर त्या कॅप्सुलमध्ये कोकेन असल्याची पुष्टी झाली.

जप्त केलेल्या पदार्थाचे एकूण वजन अंदाजे ४८२.६६ ग्रॅम होते. याची अंदाजे बाजार मूल्य रूपये ४, ८२, ६०,००० इतके आहे. केनियन नागरिकाला अटक करण्यात आलीय. तस्करीच्या कारवाईत सहभागी असलेल्या इतरांची ओळख उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या तस्करीमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे, याची चौकशी केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply