Mumbai Crime : झोपमोड झाल्याने मुलगा संतापला; रागाच्या भरात आईला २२ वेळा चाकूनं भोसकलं; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai : मुंबईत एक खळबळजनक घटना घडली आहे.रात्री झोपमोड झाल्याने एका ६४ वर्षीय मुलाने आपल्या आईची हत्या केली आहे.मुलाने आपल्या आईची २२ वेळा चाकू भोकसून केली आहे. मृत महिलेचे वय ७८ वर्ष होते. ग्रँट रोड परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाजी वाघ असे आरोपीचे नाव आहे. त्याने आपली वृद्ध आई रमाबाई नथू पिसाळ यांची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमाबाई पिसाळ या वयोवृद्ध होत्या. त्या रात्री घरात कामे करत असायच्या. त्यामुळे सुभाषची झोपमोड व्हायची. त्यांना रात्री झोप यायची नाही. यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणे व्हायची. याच रागातून त्याने सुभाषने हे टोकाचे पाऊस उचलले आहे.

Pune : जिल्ह्यात ५० अनधिकृत शाळा, शिक्षण विभागाचा पालकांना सावधतेचा इशारा

रमाबाई या नेहमी रात्री किचनमध्ये काम करत असायच्या. त्यामुळे सुभाषला वारंवार जाग यायची. याच रागात त्याने आईवर जवळपास २२ वेळा चाकू भोकसून हत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषने आईची हत्या केल्यानंतर तो त्याच्या मेव्हण्याकडे गेला. तिथे त्याने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान, मृत महिला रमाबाई पिसाळ यांचे दोनदा लग्न झाले होते. त्यांना ८ मुले होती. त्यांच्या पतीचा आणि ३ मुलांचा मृत्यू झाला होता. तर आरोपी सुभाष वाघची बायको त्याला सोडून गेली होती. तो आईसोबत लहान घरात होता. त्यांचा ग्रँट रोडवर भाजीचा स्टॉल होता. सुभाष हा बेरोजगार असल्याने स्टॉलमधून भाड्यातून त्यांचा उदरनिर्वाह होत होता.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीवर बीएनएस कायदा (१०३)(१)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply