Mumbai Crime News : मुंबईत १२ वर्षाच्या मुलावर ४ अल्पवयीन मुलांकडून अत्याचार; धक्कादायक घटनेने खळबळ

Mumbai Crime News : चेंबूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अल्पवयीन मुलांनीच एका १२ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील चेंबूर शहरातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,चेंबूर परिसरातील एका इमारतीच्या टॅरेसवर एका १२ अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी चार अल्पवयीन मुलांना आपल्या ताब्यात घेतले आहे. पीडितेच्या वडिलांना अज्ञात मोबाईल नंबरवरूनकथित घटनेचा व्हिडिओ मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चार अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठण्यात आलेय.

NOTA: 'नोटा'ला सर्वाधिक मतं मिळाल्यास पुन्हा होणार निवडणूक? सुप्रीम कोर्टाने उचललं महत्त्वाचं पाऊल

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील परिसराती २२ मजल्यांच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या टॉवरच्या टॅरेसवर रविवारी २१ एप्रिल रोजी ही घटना घडली. १५ ,१३ आणि १४ तसेच १६ अशी या घटनेत ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांचे वय आहे. २१ एप्रिल रोजी या चार मुलांनी पीडित मुलाला काही कारण देऊन इमारतीच्या टॅरेसवर नेले त्यानंतर चार मुलांना त्या मुलावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कोणालाबही सांगू सांगू नको, असे सांगितले.

पीडित मुलांचे वडिल चेंबूर येथील स्थानिक विक्रेते आहे. गुरुवारी पीडित मुलाच्या वडिलांना एका अज्ञात मोबाईल नंबरवरून व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये इमारतीच्या टॅरेसवर चार अल्पवयीन मुले पीडित मुलावर अत्याचार करीत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ पाहताच क्षणी ते घाबरले. त्यांनी मुलाला विश्वासात घेऊन सर्व प्रकार विचारला असता चार मुलांनी त्याच्यावर जबरदस्ती केल्याचे सांगितले. त्यानंतर गुरूवारी रात्री पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत अनेक गोष्टीची पडताळणी केली. त्यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल केला.

पीडित मुलाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, चार मुलांच्या पालकांना घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली.त्यानुसार चार अल्पवयीन मुलांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. मुलांच्या सुधारणेसाठी त्यांना समुपदेशन करण्यात येईल. शिवाय पीडित मुलांना कोणतीही दुखापत झालेली नाही असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले असून पोलिसांना संशय आहे या चार मुलांपैकी एकाने सर्व व्हिडिओ मोबाईमध्ये कैद केला आहे मात्र कोणी केला त्या मुलाचे नाव समजू शकले नाही.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply