Mumbai : अक्षय कुमारच्या नावाने तरुणीला लावला ६ लाखांचा चुना, जुहू पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Mumbai : मुंबईमध्ये  येऊन फिल्मी दुनियेमध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी देशभरातील तरुण-तरुणी मुंबईमध्ये येतात. पण अनेकदा या तरुणांची फसवणूक होते. या तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. आता मुंबईमध्ये अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने एका तरुणीची तब्बल ६ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चित्रपटामध्ये काम देतो असे सांगत एका तरुणीची फसवणूक करण्यात आली आहे. तरुणीची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जुहू पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे. रोहन मेहरा उर्फ राजन अंजनिकुमार सिन्हा (29वर्षे) असं या आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपींने या तरुणीसारखं आणखी कोणाची फसवणूक केली नाही ना याचा तपास जुहू पोलिस करत आहेत.

Pune : ट्रॅफिक सिग्नलवर बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पोलिस करणार कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या 'केप ऑफ गुड फिल्म्स' या प्रोडक्शन कंपनीच्या माध्यमातून चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून 28 वर्षीय तरुणीची फसवणूक करण्यात आली. या तरुणीचा पोर्टपोलिओ बनवण्यासाठी आरोपीने तिच्याकडून सहा लाख रुपये उकळले. तरुणीची फसवणूक करून आरोपी पैसे घेऊन फरार झाला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच या तरुणीने जुहू पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रोहन मेहराविरोधात कलम 419, 420 भादंविनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. जुहू पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे. आरोपीने अशाप्रकारचे आणखी कोणाची फसवणूक केली की नाही या सर्व बाजूने पोलिस सध्या तपास करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून फिल्मी दुनियेमध्ये येणाऱ्या तरुण-तरुणींनी सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply