Mumbai Crime News : कॉलनीतील सहकाऱ्याच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; तटरक्षक दलातील दोन जवानांना अटक

Mumbai Crime News : भारतीय तटरक्षक दलात कार्यरत असलेल्या दोन जवानांनी सहकारी जवानाच्या १५ वर्षीय मुलीवर सामूहिक केला. ही धक्कादायक घटना मुंबईतील पवई परिसरात घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रार दाखल होताच पवई पोलिसांनी संशयित जवानांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेला एक आरोपी ३० तर दुसरा आरोपी २३ वर्षांचा आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १५ वर्षांची असून इयत्ता दहावीत शिक्षण घेते. 

Maharashtra Politics : 'माझा हातोडा पुण्यात चालणारच', लोकसभा निवडणूक लढण्यावर वसंत मोरे ठाम

आरोपी आणि पीडितेचे वडील भारतीय तटरक्षक दलात एकमेकांचे सहकारी आहेत. ते मुंबईतील पवई परिसरात असलेल्या एकाच कॉलनीत राहतात. तक्रारीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सव होता. त्यावेळी पीडितेच्या घरातील सर्व मंडळी आणि आरोपीची पत्नी बाहेर गेली होती.

पीडिता घरात एकटी असल्याचं पाहून आरोपीची नियत फिरली. माझ्या पत्नीने तुला बोलावले आहे, असं सांगून आरोपीने तिला घरात बोलावले. पीडिता घरात येताच आरोपी आणि त्याच्या साथीदाराने पीडितेचे तोंड दाबून तिला बेडरूममध्ये नेले. तिथे दोघांनीही आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीने त्यांना विरोध केला असता, दोन्ही आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकारामुळे पीडिता तणावाखाली गेली. सुरुवातीला याबाबत कुणाकडेही वाच्यता केली नाही. मात्र, आरोपी तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याने अखेर आपल्यासोबत घडलेला प्रकार आईजवळ कथन केला.

मुलीवर बलात्कार झाल्याचं कळताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने वडिलांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी तटरक्षक दलाकडे याप्रकरणी तक्रार केली. यानंतर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले. अखेर पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पवई पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply