Mumbai Crime News : विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Mumbai Crime News :  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे आमदारांना परदेश वारी घडवणाऱ्या कंपनीकडे दोघा तोतयांनी पैसे मागीतल्याने खळबळ उडाली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर दोघा अज्ञातांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांने प्रसंगावधान दाखवल्यामुळे फसवणूक टळली आहे, मात्र चक्क विधानसभा अध्यक्षांच्या नावावेच फसवणुकीचा प्रकार घडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांना परदेश वारी घडवण्याचे कंत्राट एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला देण्यात आलेले आहे. दरम्यान या कंपनीच्या कार्यालयात भर दुपारी ३ वाजता दोघं अचानक शिरले. या दोन्ही आरोपींनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने पैशांची मागणी केली. तसेच त्यांना खात्री पटावी यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी फोनवरून संवाद साधून देण्याचे नाटकही केले. धक्कादायक बाब म्हणजे फोनवरून एका तोतया इसमाने नार्वेकर यांच्या नावाने कर्मचाऱ्याशी संवादही साधला.
 
मात्र या प्रकरणात काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी दोन्ही आरोपींनी कर्मचाऱ्यास धमकी देऊन तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार नार्वेकर यांच्या कानावर पडताच त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. तसेच त्यांच्या स्विय सहाय्यकाकडून तात्काळ मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply