Mumbai Crime News : दिवसा घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी अटकेत

मुंबई : सुरक्षारक्षक नसलेल्या इमारतीतील बंद सदनिका हेरून दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दुकलीला सानपाडा पोलिसांनी अहमदाबाद येथून अटक केली आहे. अकबर ऊर्फ फिरोज ऊर्फ बाबू सुलतान रफीक सैफी (वय ३९) व रमेशकालू बैसाखीराम राजपूत (वय ४८) अशी या सराईत चोरट्यांची नावे असून हे चोरटे रेल्वेने दिल्ली, उत्तर प्रदेश येथून मुंबईत फक्त घरफोडी करण्यासाठी येत असल्याचे तपासात निष्पन्न झाल.

या प्रकरणात अटक आरोपी दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यातील असून ते दिल्ली, उत्तर प्रदेश येथून मुंबईत फक्त घरफोडी करण्यासाठी येत होते. घरफोडीत मिळालेला ऐवज घेऊन ते पुन्हा दिल्लीत जात होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये या टोळीने सानपाडा सेक्टर-५ मधील त्रिमूर्ती अपार्टमेंटमधील गुरुनाथ पडेलकर यांच्या बंद घरातील दागिने व रोख रक्कम असा तब्बल ६ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता.

सानपाडा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन माग काढण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार सानपाडा पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करत बातमीदारांच्या मदतीने या गुन्ह्यातील दोन आरोपींना अहमदाबाद येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ५४ हजार रुपये किमतीची सोन्याची दागिने जप्त करण्यात आले आहेत. या चोरट्यांविरोधात वेगवेगळ्या राज्यात दिवसा घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात आढळून आले आहे.

आरोपींविरोधात रबाळे, दादर, वनराई, नालासोपारा, अहमदाबाद, गुजरात, दिल्लीतील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील इतर दोन आरोपी तरुण चौधरी व किशन हे फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

 - विवेक पानसरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply