Mumbai Crime : मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; 'डीआरआय'कडून ७० कोटी किंमतीचे हेरॉईन जप्त ; 2 नायजेरीयन अटकेत

मुंबई : मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. विमानतळावरून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावरून ७० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर 'डीआरआय'ने अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांच्या पर्दाफाश केला आहे. अदिस अबाबावरून आलेल्या प्रवाशाकडून ७० कोटी किंमतीचं हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. ट्रॅव्हल बॅगेतून अमली पदार्थाची तस्करी सुरू होती. 'डीआरआय'ने तब्बल १० किलो हेरॉईन जप्त केली आहे.

'डीआरआय'ने कारवाई कशी केली?

मुंबई विमानतळावर अदिस अबाबावरून एका प्रवासी आला होता. त्याच्याजवळ ७० कोटी किंमतीचे १० किलो हेरॉईन होते. 'डीआरआय' अधिकाऱ्यांना या तस्करीची खबर मिळताच त्यांनी सापळा रचला.'डीआयआर'च्या अधिकाऱ्यांनी अदिस अबाबावरून आलेल्या प्रवाशाला अटक केली. तर हेरॉईन घेण्यासाठी आलेल्या नायजेरीयन नागरिकाला देखील अटक केली. नायजेरीयन नागरिकाच्या घरून छोट्या प्रमाणात कोकेन आणि हेरॉईन जप्त केलं आहे. नायजेरीयन नागरिक आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याची माहिती देखील समोर आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply