Mumbai Crime : मुंबई हादरली, रिक्षाचालकाचा २० वर्षीय तरूणीवर बलात्कार, गुप्तांगात ब्लेड अन् दगड आढळले

Mumbai Crime News : मुंबईतून हादरवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये रेल्वे स्टेशनच्या जवळच रिक्षाचालकाने २० वर्षीय तरूणीवर अत्याचार केला. नराधम रिक्षा चालकाने त्या तरूणीवर ब्लेड अन् दगडाने हल्ला केला. राम मंदिर स्टेशनच्या आवारात २० वर्षीय तरूणी बेशुद्ध अवस्थेत आढळली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.

मुंबईतील राम मंदिर स्टेशन परिसरात २० वर्षीय तरूणीवर अज्ञात रिक्षा चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. सिझेरियन ब्लेड अन् दगडाने त्या रिक्षा चालकाने तरूणीवर हल्ला केला. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांकडून हल्लेखोर रिक्षा चालकाचा शोध सुरू करण्यात आलाय. पीडित मुलगी मुंबईतील राम मंदिर स्टेशनच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत आढळली. रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी राज रतन वाळवल या आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांकडून याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.

CET Exam : सेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, अभ्यासाला एक महिन्याचा वेळ मिळणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी या प्रकरणाबद्दल माहिती मिळाली. त्या महिलेला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून तपास कऱण्यात येत आहे. डॉक्टरांनी मुलीच्या गुप्तांगातील सीझेरियन ब्लेड आणि काही दगड बाहेर काढले आहेत.

पीडित मुलगी नालासोपारा येथील आहे. वानाराई पोलिसांनी रिक्षा चालकाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्याशिवाय त्या परिसरातील रिक्षा चालकांची चौकशी करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply