
Mumbai : मुंबईत मंगळवारी सगळीकडे धुळवडीचा जल्लोष सुरू असताना वडाळ्यात मात्र उत्साहाला गालबोट लागले. बियरची बाटली पडून फुटल्याने झालेल्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत 20 वर्षीय तुषार उज्जैनवाला याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. ऐन सणासुदीच्या दिवशी अशी घटना घडल्याने परिसरात दु:ख व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे अतिशय क्षुल्लक कारणावरुन ही घटना घडली आहे. अशाप्रकारे राडा करणाऱ्यांना पोलिसांचं भय नाही का? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा परिसरात कार्यक्रमासाठी बांधलेल्या एका स्टेजच्या बाजूला चारजण बियर पित बसले होते. सायंकाळी चारच्या सुमारास तुषारचा भाऊ आणि त्याचा मित्र येथून चालले होते. तुषारच्या भावाचा पाय एका बियरच्या बाटलीला लागला आणि बाटली खाली पडून फुटली. यामुळे संतापलेल्या चौघांनी तुषारच्या भावासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ आणि धक्काबुक्की करतानाच त्यांनी बियरची मागणी केली. चौघे ऐकत नसल्याचे पाहून या तरूणाने घर गाठले आणि सर्व हकिकत तुषारला सांगितली.
दोन गटात वाद आणि हाणामारी
चौघांना जाब विचारण्यासाठी तुषार हा आणखी तिघांसह त्या ठिकाणी आला. यावेळी दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. यानंतर तुषारसोबत असलेले तिघे बाजूला गेल्यानंतर पुन्हा वाद झाला. तुषार एकटाच असल्याचे पाहून चौघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तुषार बेशुद्ध पडल्याने येथील नागरिकांनी त्याला सायन रुग्णालयात नेले. मात्र त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेतल तुषारला मारहाण करणाऱ्या चार तरूणांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

