
Mumbai : जुहू कोळीवाडा येथील समुद्रकिनारी सोमवारी एका गोणीमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या अवशेषांचे गूढ उकलण्यात सांताक्रूझ पोलिसांना यश आले. मृत तरुण मालवणी परिसरातून बेपत्ता झाला होता. त्याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याचा मित्र वाहिद अली शेख उर्फ मिट्टू (३०) याला अटक केली आहे. विवाहबाह्य संबंधांमध्ये अडसर ठरत असल्याने वाहिद याने त्याचा काटा काढल्याची प्राथमिक माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू कोळीवाडा येथील समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालत असताना पोलिसांना एक गोणी दिसली. संशयास्पद वाटल्याने गस्तीवरील पोलिसांनी जीवरक्षकाच्या मदतीने ती उघडली असता, आतमध्ये अर्धवट आणि कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला, तर सांताक्रूझ पोलिसांनी तपास सुरू केला.
|
|
वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश शिंदे आणि सखाराम मोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक तुषार सावंत, सुयोग अमृतकर, भूषण मोरे, विजय खंडागळे, उपनिरीक्षक समीर बोडके यांची पथके तपास कामी लावण्यात आली. मृतदेहाची ओळख पटविण्यास प्राधान्य असल्याने प्रथम सर्व पोलिस ठाण्यांतील हरविलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली. त्यावेळी मालवणीतून बेपत्ता झालेल्या तरुणाची माहिती मिळाली.
प्रेमसंबंधातील अडसर हटवला
मूळचा उत्तर प्रदेश येथील हा तरुण हा पत्नीसह मालवणी येथे वास्तव्यास होता. तो बेपत्ता असल्याचे समजताच पोलिसांनी मालवणी परिसर पिंजून काढला. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला ओळखणाऱ्या वाहिद याला ताब्यात घेण्यात आला. वाहिद आणि मृताची पत्नी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. त्याचबरोबर तो अखेरचा वाहिद याच्यासोबत दिसल्याचे अनेकांनी सांगितले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता वाहिद याचा गारमेंटचा कारखाना असून सर्व कामगार गेल्यानंतर त्याने या तरुणाला बोलावून घेतले. त्याला दारू पाजून धारदार शस्त्राने त्याची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने मृतदेह समुद्रात फेकल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

