Mumbai Crime : शिवी दिल्याने तरुणाची सटकली, मित्रालाच जिवानिशी मारलं

 

Mumbai Crime : मुंबईमध्ये किरकोळ वादातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अंधेरीमध्ये ही घटना घडली आहे. शिवी दिल्याचा राग आल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या मित्राची हत्या केली. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील कोल डोंगरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. कोल डोंगरी सहार रोडवरील यशोधन सोसायटीच्या मोकळ्या जागेत सुजित सिंग (३९ वर्षे) आणि सुनील परशुराम कोकाटे (५२ वर्षे) हे गप्पा मारत बसले होते. गप्पा मारताना सुजितने सुनीलला शिवी दिली.

Valentine Day : व्हॅलेंटाईनला मावळच्या गुलाबाचा बहर; ८० लाख फुलांची परदेशात निर्यात; गुलाब निर्यातीत मावळ राज्यात प्रथम

शिवीगाळ केल्यामुळे सुनील कोकाटेची सटकली. त्याने सुजितलाा मारहाण करत त्याच्यावर चाकूहल्ला केला. सुनीलने चाकूच्या सहाय्याने सुजितच्या छातीवर आणि हातावर वार केले. या हल्ल्यामध्ये सुजित गंभीर जखमी झाला. रक्तस्राव अधिक प्रमाणात झाल्यामुळे तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला.

मध्यरात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मयत सुजितच्या पत्नीच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिस ठाण्यात सुनीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply