Mumbai : पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे करणार उद्घाटन

 Mumbai Costal Road Inauguration:मुंबईकरांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी. मुंबईच्या कोस्टल रोड या मुंबईच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कोस्टल रोडचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 27 फेब्रुवारी, 29 फेब्रुवारी किंवा 3 मार्च यापैकी एका तारखेला हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. १९ फेब्रुवारीलाच या कोस्टल रोडचे उद्घाटन होणार होते.

Pune : औद्योगिक सुरक्षा विभागावर प्रश्‍नचिन्ह ; कुरकुंभ येथील अमली पदार्थ जप्ती प्रकरण, दोषींवर कडक कारवाईची मागणी

मात्र ऐनवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाल्याने हा कार्यक्रम रखडला गेला. या कोस्टल रोड प्रकल्पाचे 85% पेक्षा अधिक काम पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह ४ लेन सुरु करण्यात येणार आहेत तर मे २०२४ पर्यत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र दौरे चांगलेच वाढल्याचे दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच पंतप्रधानांच्या या दौऱ्याला विशेष महत्व असून निवडणुकांच्या दृष्टीने ते मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply