Mumbai Boat Accident : धक्कादायक! गेटवेकडून एलिफंटाला जाणारी ३० प्रवाशांची बोट उलटली, मुंबईतील घटना

Mumbai : मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ भयंकर घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी बोट उलटल्याची घटना घडली आहे. या बोटमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या भयंकर प्रकारानंतर प्रवाशांसाठी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गेटवेजवळ मोठी दुर्घटना घडली. गेटवेहून एलिफंटाला जाणाऱ्या ३० ते ३५ प्रवाशांची बोट उलटल्याची घटना घडली आहे. ही बोट उलट्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. बोट उलटल्यानंतर जीवरक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले. या जीवरक्षकाकडून तातडीने प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले.

Pune Crime : ११ वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार, डान्स टीचरला अटक; पुण्यातील संतापजनक घटना

एलिफंटाकडे दररोज पर्यटकांचा ओढा असतो. त्यामुळे दररोज शेकडो लोक एलिफंटा या ठिकाणी जात असतात. या बोटमधील प्रवासी पाण्यात पडल्यानंतर जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात कोणत्याही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

मुंबईच्या गेट ऑफ इंडियाकडून एलिफंटा गुफा पाहण्यासाठी हजारो जण जात असतात. बुधवारी दुपारी पर्यंटकांनी भरलेल्या दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बोट उलटली. या घटनेनंतर तातडीने जीवरक्षक मदतीसाठी पोहोचले. या जीवरक्षकांनी तातडीने प्रवाशांना लाइफ जॅकेट दिले. या दुर्दैवी घटनेत ३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

उलटलेल्या बोटीचे नाव नीलकलम असे आहे. उरण, कारंजा परिसरात बोट उलटल्याची माहिती हाती आली आहे. नेव्ही, जेएनपीटी, कोस्टगार्ड, पोलीस आणि स्थानिक मच्छिमार यांच्या साहाय्याने बचावकार्य सुरु करण्यात आलं. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. ही दुर्घटना घडताच परिसरातील इतर बोटी घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी बचावकार्य सुरु केलं. आतापर्यंत या घटनेतील ६६ प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. तर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply