Mumbai Best Bus Accident : बोरिवलीत भरधाव बेस्ट बसने दुचाकीला उडवलं; ५ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, आजोबा जखमी

Mumbai Best Bus Accident : मुंबईतील बोरिवली परिसरात मंगळवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. भरधाव बेस्ट बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील ५ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी पोलिसांनी बसचालकावर गुन्हा दाखल केलाय.

मागील काही दिवसांपासून मुंबईत अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवसागणित किरकोळ तसेच गंभीर स्वरुपाचे अपघात घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे बेस्ट बसच्या धडकेत एका ५ वर्षीय चिमुकलीचा मृ्त्यू झाला. मृत चिमुकली आपल्या आजोबासोबत दुचाकीवरून जात होती.

Pune Porsche Case : 'जामीन मिळाला तरीही दोषीवर कारवाई करणारच', पीडित कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी 10 लाखांची मदत केली सुपूर्द

बोरिवली रोडवरील शिंपोली रोड इटोपिया टॉवर येथे दुचाकी आली असता, पाठीमागून आलेल्या बेस्ट बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की बसने दुचाकीला दूर फटफटत नेलं. यात डोक्याला मार लागल्याने ५ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातात चिमुकलीचे आजोबा जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी बेस्ट बस चालक सागर तुलसीदास कोळी (वय ३७) याच्याविरोधात तक्रा दिली असून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply