मुंबई : अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; CBI ने दाखल केले आरोपपत्र

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने आज ४९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.या प्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे.

सीबीआयने आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्याकरता विशेष सीबीआय (CBI) कोर्टाने मान्यता दिली आहे.

माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा माफीचा साक्षीदार अर्ज मुंत्रई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. वाझेच्या माफीचा साक्षीदार बनण्याच्या अर्जाला मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने मंजुरी दिली आहे. मात्र, त्यासोबत कोर्टाने अटी आणि शर्थी दिल्या आहे. सचिन वाझे याचा माफीचा साक्षीदाराचा अर्ज मंजूर झाल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी आता वाढणार आहेत.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या माफीचा साक्षीदाराचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. मात्र त्यासोबत कोर्टाने अटी आणि शर्थी दिली आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात अडचणी वाढणार आहे.

दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख सध्या कोठडीत आहेत. १०० कोटी वसुली प्रकरणात मागच्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची उकल केली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात याअगोदर सचिन वाझेचा हात असल्याचे याअगोदर रिपोर्टमधून समोर आले आहे. आता सचिन वाझे १०० कोटी वसुली प्रकरणात माफीचा साक्षीदार झाल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार आहे. त्यामुळे सचिन वाझे कोर्टात आता काय साक्ष देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply