
Mumbai Airport News : महत्वाची बातमी . मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळ 17 ऑक्टोबरला 6 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या सहा तासांदरम्यान मुंबई विमानतळावरून कोणतंही उड्डाण होणार नाही.
मुंबई विमानतळ सहा तासांसाठी बंद
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळावरील दोन रनवे मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबई विमानतळ सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांच्या देखभालीच्या कामासाठी मंगळवारी 11 ते 5 या वेळेत बंद केलं जाईल, अशी माहिती विमानतळ ऑपरेटरने एका निवेदनात दिली आहे.
बंदचं कारण काय?
मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्टीवर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. विमानतळ ऑपरेटरच्या निवेदनानुसार सांगण्यात आलं आहे की, "छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही रनवे RWY 09/27 आणि RWY 14/32 हे 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:00 वाजता ते 17:00 वाजेपर्यंत तात्पुरते नॉन-ऑपरेशनल राहतील." निवेदनात पुढे म्हटलं आहे की, "सीएसएमआयए (CSMIA) ने सर्व महत्त्वाच्या विभागांच्या सहकार्याने देखभालीचं काम सुरळीत पूर्ण करणे सुनिश्चित करण्यासाठी प्रभावीपणे उड्डाणे निर्धारित केली आहेत. सीएसएमआयएला प्रवाशांकडून सहकार्य आणि पाठिंबा अपेक्षित आहे."
|
|
सहा तास एकही विमान उडणार नाही
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 17 ऑक्टोबर रोजी सहा तासांसाठी तात्पुरतं बंद करण्यात येणार आहे. मुंबई विमानतळ तात्पुरतं बंद करणे सीएसएमआयएच्या वार्षिक प्रतिबंधात्मक देखभालीसाठी आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरील या नियोजित तात्पुरत्या बंदचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या पायाभूत सुविधा सुधारून त्यांचा सर्वोत्तम दर्जा राखण्यासाठी आहे. या काळात आवश्यक असलेली दुरुस्ती आणि देखभाल कामे करण्यात येतील. एअरमेनला नोटीस (NOTAM) एअरलाइन्स आणि इतर संबंधितांना सहा महिने अगोदर जारी करण्यात आली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी




























Subscribe to my channel


