Mumbai Air Pollution : मुंबईकर सावधान! मुंबईची हवा बनली घातक? धक्कादायक माहिती आली समोर

Mumbai Air Pollution : मुंबईकरांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. आज सोमवारी मुंबईतील हवेची पातळी अतिशय खाली घसरली आहे. २५६ AQI दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने मुंबईसह उपनगरांच्या हवेच्या गुणवत्तेची देखील माहिती दिली आहे. 

नवी मुंबईतील हवेत सर्वाधिक प्रदूषण

मुंबईपेक्षा नवी मुंबईतील हवेत जास्त प्रदूषण असल्याचे समजले आहे. भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ होसाळीकर यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर हवेच्या गुणवत्तेची माहिती दिली आहे. त्यानुसार नवी मुंबईत ३३२ AQI ची नोंद करण्यात आली आहे.

या चार शहरांमधील नागरिकांना होऊ शकतो श्वसनाचा त्रास

दररोज वाहनांचा धूर, कारखाने या सर्वांमुळे हवेची गुणवत्ता जास्त खालावलेली दिसत आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, चेंबुर आणि कुलाबा या शहरांची नावे आहेत. चेंबुरमध्ये देखील हवेची गुणवत्ता जास्त प्रमाणावर खालावली आहे. इथे ३१५ AQI ची नोंद करण्यात आलीये. तर कुलाबामध्ये ३०१ AQI ची नोंद करण्यात आली आहे.

हवेची गुणवत्ता ढासळत चालल्याने नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. सकाळच्या वेळी वॉकींगला जाताना नागरिकांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबई हवा वाईट हून अती वाईट झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे श्वसनाचा त्रास असलेल्या नागरिकांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply