Mumbai Air Pollution : फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबई-पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली; दिल्लीत श्वास घेणंही कठीण

Mumbai Air Pollution : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ झाली असून हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. पुण्यातही हवेची गुणवत्ता बिघडल्याचे निदर्शनास आले आहे. हवा खराब होत असल्याने मुंबईत दिवाळीत फटाके फोडण्यावर न्यायालयाने निर्बंध घातले आहेत.

असं असतानाही मुंबईसह पुणेकरांनी रविवारी पहाटेपासूनच फटाक्यांची आतषबाजी केली. सायंकाळी लक्ष्मीपूजनानंतर तर मोठ्या प्रमाणात फटाके उडवण्यात आले. त्यामुळे मुंबईसह पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली आहे.

Manoj Jarange Patil : १५ नोव्हेंबरपासून पुन्हा महाराष्ट्र दौरा, शांततेच्या मार्गाने आंदोलन... जरांगे पाटलांची पुढची रणनिती ठरली!

मुंबईत सोमवारी पहाटेपासून हवेत मोठ्या प्रमाणात धुराचे प्रमाण दिसून येत होते. दुसरीकडे पुण्यातील हवेतही धूरच धूर दिसून येत होता. पुणे शहर आणि परिसरातील काही भागांमध्ये रविवारी हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर गेल्याचे दिसून आले. 

पिंपरी चिंचवड, भोसरी, आळंदी, कात्रज अशा काही भागांमधील हवेची गुणवत्ता बिघडल्याचं समोर आलं आहे. नागरिकांना श्वास घेतना त्रास होणे, दम लागणे अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

वायू प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेकडून मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. फटाक्यांचा तसेच वाहनांचा धूर, बांधकामे, यामुळेच पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

प्रदूषणामुळे दिल्लीत श्वास घेणंही कठीण

दिल्लीतील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावली आहे. दिवाळीच्या रात्री राजधानी दिल्लीत फटाक्यांची आतषबाजी केल्याने हवेत धूर दिसून येत होता. त्यामुळे अनेक भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत पोहोचला आहे. ज्या भागात AQI मध्ये वाढ नोंदवली जात आहे.

दिवाळीच्या संध्याकाळपर्यंत दिल्लीचा सरासरी AQI २१८ नोंदवला गेला होता, ज्याने दिवाळीच्या दिवशी सर्वोत्तम हवा घेऊन ८ वर्षांचा विक्रम मोडला. दिवाळीच्या दिवशी दिल्लीतील लोकांना निरभ्र आकाश दिसले आणि हवा श्वास घेण्यायोग्य झाली. मात्र, रात्रीच्या सुमारास हवा खराब होत गेली आणि तापमान कमी झाल्याने प्रदूषणाची पातळी वाढू लागली आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply