Mumbai Air Hostess Murder : मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेसची गळा चिरुन निर्घृण हत्या!

Mumbai Air Hostess Murder : मुंबईजवळील पवई इथं एका विमान कंपनीत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मरोळ इथल्या राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, रूपल ओगरे (वय २३, मूळगाव रायपूर, छत्तीसगड) असं या एअर होस्टेसचं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच असलेल्या अंधेरी उपनगरातील मरोळ इथंल्या एनजी कॉम्प्लेक्स इथं ती आपली बहिण आणि मित्रासोबत रहायला होती.

Maratha Reservation : सिंदखेड राजा येथे मराठा आंदोलक आक्रमक; तहसीलदारांची खुर्ची पेटवण्याचा प्रयत्न

दरम्यान, हत्येची घटना घडली तेव्हा रुपल घरी एकटीच होती कारण तिची बहिण आणि मित्र हे दोघेही आपल्या गावी गेले होते. पवई पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply