Mumbai - Agra Highway Accident : मुंबई आग्रा महामार्गावर एसटी- कंटेनरचा भीषण अपघात! कंडक्टरचा जागीच मृत्यू; ४ जखमी

Mumbai - Agra Highway Accident : मुंबई -आग्रा महामार्गावरुन भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गावरील चांदवड चौफुलीवर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला असून 4 कॉलेज विद्यार्थ्यांसह काही प्रवासी जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यभर गणपती विसर्जनाचा जल्लोष सुरू असतानाच मुंबई आग्रा महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गावरील चांदवड चौफुलीवर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला असून 4 कॉलेज विद्यार्थ्यांसह काही प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमींना तात्काळ चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा मागचा भाग पूर्णपणे कापला गेला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply