Mumbai AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार, आजपासून मध्य रेल्वेवर धावणार १४ नव्या एसी लोकल; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Mumbai AC Local : मुंबईत उकडा प्रचंड वाढला असून मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यामुळे प्रवास करताना देखील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अशामध्ये मुंबईकरांचा लोकल प्रवास आता आणखी गारेगार होणार आहे. आजपासून मध्य रेल्वे मार्गावर १४ अतिरिक्त एसी लोकल ट्रेन धावणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

वाढत्या उष्णतेमुळे एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवाशांची एसी लोकलची वाढती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने एसी लोकल वाढवण्याबाबत निर्णय घेतला. मध्य रेल्वे मार्गावर आधी ६६ एसी लोकल धावत होत्या. आता ही संख्या ८० वर पोहचली आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने नॉन एसी लोकलच्या जागी १४ एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर दररोज धावणाऱ्या लोकलची संख्या १८१० इतकी झाली आहे. या नवीन एसी लोकल सोमवार ते शनिवार दरम्यान चालवण्यात येतील. रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या मार्गावर नॉन एसी लोकल सुरू राहतील.

उन्हाळ्यामध्ये प्रवाशांकडून वारंवार एसी लोकलची मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेऊन एसी लोकलची संख्या वाढवण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'एसी लोकल लोकप्रिय आहे. उन्हाळा वाढत असल्यामुळे एसी लोकलची संख्या वाढवून एकूण लोकल सेवेच्या वारंवारतेवर परिणाम न होता प्रवास अधिक आरामदायी करता येणार आहे.'

ऑफिसला जाणारे, दिवसा प्रवास करणारे आणि रात्री उशिरा प्रवास करणारे यांच्या वेळा लक्षात घेऊनच १४ नवीन एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. सीएसएमटी आणि कल्याण, ठाणे आणि बदलापूर या दरम्यान सकाळी आणि रात्रीपर्यंत या एसी लोकल धावणार आहेत.

दरम्यान, २०२४ मध्ये एकूण २.८४ कोटी प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला. २०२३ च्या तुलनेत ही संख्या सुमारे ३० टक्के जास्त आहे. २०२३ मध्ये मध्य रेल्वेवर एकूण एसी लोकल प्रवाशांची संख्या २.०९ कोटी होती. त्याचप्रमाणे, २०२४ मध्ये मध्य रेल्वेवर एसी लोकल ट्रेनमधून १२४.०१ कोटी रुपये उत्पन्न झाले. जे २०२३ च्या तुलनेत सुमारे ३० टक्के जास्त आहे. २०२३ मध्ये मध्य रेल्वेला एसी लोकलमधून ९४.०७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

नवीन एसी लोकलचे वेळापत्रक -
अप मार्ग (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने)

१. कल्याण ०७:३४ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ०९:०५

२. बदलापूर १०:४२ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १२:१२

३. ठाणे १३:२८ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १४:२५

४. ठाणे १५:३६ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १६:३४

५. ठाणे १७:४१ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १८:४०

६. ठाणे १९:४९ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस २०:४८

७. बदलापूर २३:०४ - ठाणे २३:५९

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply