Classical Language Status : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? निर्णयाने काय होणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

Mumbai : केंद्र सरकारने अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी माणसांकडून गेल्या ६ दशकांपासून सुरु असलेल्या मागणीला यश मिळालं आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं आश्वासन पूर्ण केलं आहे. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय आणि केंद्राच्या निर्णयाने राज्याला नेमका काय फायदा होणार, जाणून घेऊयात.

अभिजात भाषेचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून निर्णय घेतला जातो. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषांची नोंद ही राज्य घटनेच्या आठव्या सूचीमध्ये करण्यात येते.

अभिजात भाषा म्हणजे काय, या भाषेसाठी कोणते निकष लावले जातात?

अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकार देतो. अभिजात भाषेच्या साहित्याचा इतिहास हा १५००-२००० वर्षे प्राचीन असायला हवा. या भाषेचं साहित्य प्राचीन आणि मौल्यवान असायला पाहिजे. ही भाषा कोणत्याही भाषेतून उसनी घेतलेली नसावी. प्राचीन भाषेचे स्वरुप हे आताच्या भाषेपासून वेगळं असायला हवं. आतापर्यंत तमिळ, संस्कृत, कन्नडक तेलुगू, मल्याळम, ओडिया या भाषांना जागतिक भाषांना दर्जा मिळाला आहे.

Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळिमा..! धावत्या स्कूल बसमध्ये २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने या भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतो. अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची देखील स्थापना करण्यात येते. तसेच प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं. अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांसाठी पायाभूत संस्थांसाठी अर्थसहाय्य दिलं जातं.

या भाषेच्या संशोधन प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक मदत पुरवली जाते. या भाषेतील बोलींचा अभ्यास-संशोधन व साहित्यसंग्रहासाठी प्रोत्साहन मिळतं. देशातील सर्व विद्यापीठांमध्ये अभिजात भाषा शिकण्याची सोय होते. या भाषेतील प्राचीन ग्रंथ अनुवादासाठी प्रयत्न होतात. त्याचबरोबर ग्रंथालये, संस्था, संशोधकांना केंद्राकडून भरीव मदत मिळते.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर पंतप्रधान काय म्हणाले?

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'मराठी भाषा ही भारताचा अभिमान असून अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. ही भाषा कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल'.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply