Mumbai : धारावीतील मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यास सुरूवात, ट्रस्टनेच सुरू केली तोडक कारवाई

Mumbai : धारावीतील मशिदीवरील तोडक कारवाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना या मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यास सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. ट्रस्टने स्वतःहूनच मशिदीचा वरचा भाग तोडण्यास सुरुवात केली. दहा फूटापर्यंतचा भाग सोडून वरचे तीस फुटाचे बांधकाम तोडावे लागणार असून त्याला चार पाच दिवस लागण्याची शक्यता आहे.

धारावी येथील ९० फूट रस्त्यावरील मेहबूबे सुभानिया या मशिदीचे अतिक्रमित बांधकाम पाडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाचे पथक गेल्या आठवड्यात धारावीत गेले होते. ही साधारण २५ वर्षे जुनी मशिद असल्याचे समजते. मशिदीच्या पाडकामावरून परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. पालिकेच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या. प्रशासनाने मशिदीशी संबंधित ट्रस्टला नोटीस बजावली होती. त्यानंतर कारवाई हाती घेतली होती. अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने चार ते पाच दिवसांची मुदत द्यावी. या मुदतीच्या कालावधीत स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल, अशी लेखी विनंती मशिदीच्या विश्वस्तांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे परिमंडळ २ चे उपआयुक्त आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तांकडे केली. त्यानंतर ही कारवाई थांवण्यात आली होती.

Israel Hezbollah War Updates : इस्रायल-लेबनॉनचा संघर्ष चिघळला, हेझबोलाविरोधात आता जमिनीवरून हल्ले !

या कारवाईचे राजकीय पडसादही उमटले होते. समाजवादी पक्षाने व कॉंग्रेस पक्षाने या कारवाईला विरोध केला होता. अनेक आरोप-प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण तापले होते. पालिकेने दिलेली पाच दिवसांची मुदत संपल्यानंतर आता काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अत्यंत संवेदनशील अशा या प्रकरणात महापालिका प्रशासनाने तोडक कारवाई सुरू केली असती तर तणाव वाढण्याची शक्यता होती. मात्र रविवारपासून ट्रस्टच्या सदस्यांनी मशिदीच्या तोडक कारवाईची पूर्वतयारी सुरू केली होती. मशिदीच्याभोवती हिरवे कापड लावून बांधकाम तोडण्याचे काम सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी मशिदीचे घुमट तोडण्यास सुरूवात झाली, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *