IPL 2024 Hardik Pandya : हार्दिकच्या आक्रमक फलंदाजीची क्षमता कमी होतेय ; इरफान

Mumbai : हार्दिक पंड्याची चेंडू जोरात टोलावण्याची क्षमता कमी होत चालली आहे. व्यापक विचार करता ही चिंतेची बाब आहे, अशा शब्दात भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने हार्दिकचा समाचार घेतला आहे.

रोहित शर्माला दूर करून हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कर्णधार केल्यामुळे मुळात मुंबईचे असंख्य पाठीराखे नाराज झालेले आहेत. बंगळूरविरुद्धच्या सामन्यापर्यंत हार्दिकला भर मैदानात प्रेक्षकांच्या विरोधाचा सामना करावा लागले आहे.

मुंबई इंडियन्सचा पराभव झालेल्या प्रत्येक सामन्यानंतर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे हार्दिकवर खापर फोडले जाते. अनेक माजी खेळाडू आणि समालोचक असलेले हे खेळाडू हार्दिकची गोलंदाजी, फलंदाजी आणि नेतृत्व या तिन्ही बाबींवर टीका करत आहेत.

IPL 2024 Point Table : लखनौच्या विजयामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ! CSK पहिल्यांदाच टॉप 4 मधून बाहेर

इरफान पठाण तर हार्दिकचा प्रत्येक वेळी समाचार घेताना दिसत आहे. राजस्थानविरुद्ध झालेल्या मुंबई संघाच्या एकतर्फी पराभवानंतर एक्सवरून आपले मत मांडताना इरफानने हार्दिकची आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता कमी होत चालल्याचे म्हटलेच आहे. फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर एकवेळ आक्रमक फलंदाजी सोपी असेल; पण जेथे चेंडू स्वींग होतो, तेथे तर हार्दिक अपयशी ठरतोय, असेही इरफान स्पष्ट करतो.

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव लवकर बाद झाल्यावर संकटात सापडलेला मुंबईचा डाव तिलक वर्मा आणि नेहाल वधेरा यांनी ९९ धावांची भागीदारी करून सावरला. या दोघांनी मुंबईला द्विशतकी धावा करण्यासाठी चांगली पायाभरणीह केली होती; परंतु आक्रमक फलंदाजी करण्याची गरज असताना हार्दिकला केवळ १० चेंडूत १० धावाच करता आल्या आणि बघता बघता मुंबईचा डाव १७९ पर्यंत मर्यादित राहिला. गोलंदाजीतही अपयशी ठरत असलेल्या हार्दिकने आपल्या दोन षटकांत २१ धावा दिल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply