
Mumbai : राज्य सरकारचे धोरण हे उद्याोगांना मारक आहे. उद्योगांना व गुंतवणुकीला चालना देण्यासाठी या सरकारकडून गेल्या अडीच वर्षात एकदाही ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’सारख्या औद्याोगिक परिषदेचे आयोजन करण्यात आलेले नाही. राज्यात येणारे उद्योग अन्य राज्यात जात असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धोरणाचा फटका या उद्योगांना बसत आहे. ‘मर्सिडीज बेंझ’सारख्या कंपनीची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अचानक करण्यात आलेल्या तपासणीमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीवरच परिणाम होण्याची भीती शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’द्वारे व्यक्त केली आहे.
राज्य सरकारच्या उद्योग धोरणावर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी तीन बाबींवर आक्षेप नोंदविला. सरकारच्या राजवटीच्या काळात मॅग्नेटिक महाराष्ट्रचे आयोजन करण्यात आले नाही. एकदा तर ‘व्हायब्रंट गुजरात’साठी आयोजन रद्द करण्यात आले. एकीकडे तमिळनाडूसारख्या राज्याकडून महाराष्ट्रात अशा प्रकारची परिषद आयोजित करून आपल्याकडे येणारी गुंतवणूक खेचली जात असताना, राज्यात मात्र गुंतवणूक परिषदेचे आयोजन का केले जात नाही, असा सवाल त्यांनी केला.
|
|
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पुणे दौऱ्यादरम्यान ‘मर्सिडीज बेंझ’ कंपनीला भेट दिली होती. त्यावेळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत आक्षेप नोंदवत कारवाईचा बडगा उगारला होता. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण मंडळाच्या अध्यक्षांना लक्ष्य केले आहे. मोठे उद्याोग परराज्यात जात असताना प्रदूषण मंडळाकडून मर्सिडीज बेंझ कंपनीच्या अचानक करण्यात आलेल्या तपासणीमुळे उद्योगजगतात चुकीचा संदेश गेला आहे. मुळात या मंडळाचे अध्यक्ष कायदेशीर आहेत का? ती भेट होती की छापा? या प्रश्नांचे उत्तर मिळालेले नाही. ‘मर्सिडीज’ कंपनी ने नेमके काय उल्लंघन केले, याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहिले असून उत्तराची प्रतीक्षा आहे. प्रदूषण मंडळाच्या अध्यक्षांचा अहंकार जपण्यासाठी उद्याोग राज्याबाहेर घालवायचे का? आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून अशी गुंडगिरी खपवून घेतली जाईल का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून करण्यात आलेल्या मर्सिडीज कंपनीच्या तपासणीसंदर्भात होणाऱ्या टीकेबाबत अध्यक्ष सिद्धेश कदम यांना विचारले असता आपल्याला काम करायचे आहे, अशा टीकेला उत्तर द्यायला वेळ नसल्याचे त्यांनी सांगितले
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

