Mumbai : राज्यभरात दहीहंडीचा उत्साह आहे. मुंबईत विविध ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे, विक्रोळी, जोगेश्वरी, दादर अशा विविध ठिकाणी गोविंदा पथकं दहीहंडीचे थर लावत सलामी देत आहेत. मुंबईत जय जवान गोविंदा पथक हे अतिशय लोकप्रिय गोविंदा पथक असून या पथकाने विक्रोळीतील कार्यक्रमात नऊ थरांची सलामी दिली आहे. यंदा जय जवान गोविंदा पथ दहा थरांची सलामी देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या पथकाकडे अनेकांच्या नजरा आहेत.
जय जवान गोविंदा पथकाची ९ थरांची सलामी
जय जवान गोविंदा पथकाने मागील अनेक वर्षांपासून आतापर्यंत अनेक बक्षिसं जिंकली आहेत. यंदाच्या दहीहंडी उत्सवात जय जवान पथकाने सर्वात आधी विक्रोळीतील आयोजित कार्यक्रमात ९ थरांची सलामी दिली. त्यानंतर ते १० थर लावणार असल्याचं बोललं जात आहे. हे गोविंदा पथक मुंबईतील विविध ठिकाणी जात एकावर एक मानवी थर रचून सलामी देतात. शेवटच्या थराला या गोविंदा पथकाने चार एक्के लावत सलामी दिली.
जय जवान पथकासाठी यंदा ही दहीहंडी खास आहे, कारण या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच शेवटच्या चार थरांना चार एक्के लावले आहेत. मागील दोन ते तीन महिन्यांपासून हे पथक दहीदंडीचा सराव करत होते. त्यानंतर दहीहंडीच्या दिवशी या पथकाने पहिलीच नऊ थरांची सलामी विक्रोळीतील टागोरनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात दिली.
दहीहंडीसाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून गाण्यांच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला जात आहे. विक्रोळीतील या आरंभ दहीहंडी कार्यक्रमासाठी आशिष शेलार देखील उपस्थित होते. जय जवान पथकाने नऊ थर लावल्यानंतर या पथकाला बक्षिस देत आशिष शेलार यांनी पथकाचं कौतुक केलं.
दादर येथील आयडियल गल्लीत महिला पथकाने दहीहंडीचे थर लावत सलामी दिली, तर ठाण्यात रणझुंजार गोविंदा पथकाने सलामी दिली. ठाण्यातही दहीहंडीचा उत्साह जोरात आहे. अनेक पथकांनी संकल्प प्रतिष्ठान दहीदंडीमध्ये थर लावत सलामी दिली.
शहर
महाराष्ट्र
- Eknath Shinde : पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार? एकनाथ शिंदे म्हणाले…
- Maharashtra :“अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतला”; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले…
- ‘Manoj Jarange Patil on Kalicharan Maharaj : हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”
- Satara : पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
- Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- New Delhi : दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
- Lucknow : ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया