Ashish Shelar : बांग्लादेशातील हिंदूना वाचवा! ठाकरेंचा केंद्राला टोला, काँग्रेसला सोडा मग हिंदूवर बोला भाजपचे प्रत्युत्तर

Mumbai  : शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे मागील दोन ते तीन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नितला यांची ठाकरेंनी मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. तर आगामी विधानसभेच्या दृष्टीने बुधवारी मुंबईत महाविकास आघाडीमधील जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे,असे चेन्नितला यांनी ठाकरेंच्या भेटीनंतर सांगितले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांचीही भेट उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता आहे. अशातच दिल्लीतून उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री अमित शहा यांना टोला लगावला आहे. अमित शहा मला औरंगजेब क्लबचे सदस्य म्हणालेत मग त्यांनी आता बांग्लादेशातील अल्पसंख्याक हिंदूना वाचावावे असे थेट आव्हान ठाकरेंनी शहांना दिले आहे. याच बाबीवर भाजप आमदार आशिष शेलार यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे.

आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला शासकीय बैठकीला अथवा नीती आयोगाच्या बैठकीला गेले. महाराष्ट्राच्या हिताचा निधी आणायला गेले, तर इथे घरी बसून उद्धव ठाकरे टीका करतात की, मुख्यमंत्री दिल्लीला गुडघे टेकायला गेले, दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालायला गेलेत, दिल्लीला नतमस्तक व्हायला गेलेत. दिल्लीश्वरांच्या चरणी माथा टेकवायला गेलेत...सह्याद्री दिल्ली समोर झुकणार नाही. मराठी माणूस दिल्ली समोर वाकणार नाही.

Pune : प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेची सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न; वानवडी पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

ही सगळी वाक्य रचना आणि विधाने करणारे श्रीमान उद्धव ठाकरे आता दिल्लीतील काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत का ? असा सवाल करीत. भाजपा नेते शेलार म्हणाले की, किंबहुना आमचा आरोपच आहे की, होय तुम्ही दिल्लीत काँग्रेसवाल्यांची भांडी घासायलाच गेला आहेत.

त्यांनी दिल्लीत जाऊन बांगलादेशचा मुद्दा काढलाय हिंदूंचा विषय काढला आहे. मुंबईत धारावीमध्ये हिंदू कार्यकर्ता आमचा मारला गेला, खून झाला.हिरव्या पिलावळीने माँब ब्लिचिंग केले. तर उरण मध्ये यशश्री शिंदे या तरुणीचा दाऊद नावाच्या आरोपीने खून केला. तुम्ही घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या धारावीत ही गेला नाहीत आणि उरणला ही गेला नाहीत मग आमच्या नेत्यांना ढाक्याला जायचे सल्ले कसले देताय? असा सवाल शेलारांनी केला. जेव्हा भाजपाने सीएए कायदा आणला तेव्हा उबाठा आणि काँग्रेसने विरोध केला आणि आज बांगलादेशातील हिंदूंचा कैवार घेत आहेत. मग का त्यावेळी सीएए ला विरोध केला? सीएए ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला सोडा मग हिंदू विषयावर बोला असे थेट प्रत्युत्तर शेलारांनी ठाकरेंना दिले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply