Uddhav Thackeray : दिल्लीचे बूट चाटणाऱ्या घटनाबाह्य सरकारला किंमत मोजावी लागणार, ठाकरेंची तोफ

 

Mumbai  : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्र सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला बजेट आज सादर केला. बजेटमध्ये युवा, महिला आणि शेतकरी या तीन घटकांना प्रामुख्याने लक्षात घेवून बजेट सादर करण्यात आला आहे असे अर्थमंत्री सीतारामण यांनी संसदेत सांगितले. बजेटमध्ये ओडिशा आणि बिहारसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. परंतु महाराष्ट्राला तुलनेत काहीच मिळाले नाही किंबहुना राज्याचा उल्लेख सुद्धा झाला नाही असा नाराजीचा सूर विरोधकांकडून ओढण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले

बजेट सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' योजना सुरु केलेली दिसते. गेल्या दहा वर्षात महाराष्ट्र ओरबडला आणि मुंबईची लूट केली. पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. पुढे ठाकरे म्हणाले, दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले तोपर्यंत अन्याय सुरुच राहणार आहे, घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्रला मोजावी लागत आहे अश्या शब्दात ठाकरेंनी बजेटवर ताशेरे ओढले.

Union Budget 2024 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झालं का? अर्थमंत्र्यांकडून विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर, म्हणाल्या...

राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय म्हणाले

तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो नमो अशा शब्दात केंद्र सरकारच्या बजेटवर टीका केली आहे.

तर काँग्रेसकडून बजेटवर काय प्रतिक्रिया आली पाहा. "सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, महाराष्ट्राला काहीही मिळालेलं दिसत नाही आहे. हे पूर्ण पॅकेज आहे. हे जे आताचं बजेट ज्याची घोषणा झालेली आहे. एकंदरीत नितिश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रिटमेंट दिल्यासारखी वाटते. यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राकडे, विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. इथं शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. यांच्यासाठी काही दिसत नाही आहे. हे जे बजेट आहे ते फक्त महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे. असं दिसते आहे. महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामं ठेवलेलं आहे." असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *