Budget 2024 : नितीश कुमार-चंद्राबाबूंचा मोदींना पाठिंबा, त्याबदल्यात भरभरून निधी पण महाराष्ट्राला दुय्यम वागणूक, वडेट्टीवारांचा अर्थसंकल्पावर संताप

Mumbai : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून अर्थसंकल्पात या राज्यांना भरभरून दिले. परंतु एकनाथ शिंदे यांनी मोदी सरकारला पाठिंबा देऊनही या बदल्यात महाराष्ट्राला काहीही मिळाले नसल्याचे सांगत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत पायाखाली तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं? असा संताप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना व्यक्त केला.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊ घातलेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव घोषणा करण्यात येतील, असे बहुतांश राजकीय विश्लेषकांना वाटत होते. परंतु बिहार, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यांचा अर्थसंकल्पात उल्लेख करून त्यांच्यासाठी निधीची घोषणा करण्यात आली. त्याचवेळी महाराष्ट्राच्या वाट्याला ठळकपणे काहीही दिसत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. विजय वडेट्टीवार यांनीही या अर्थसंकल्पावर कडाडून टीका केली आहे.

Kolhapur Flood Situation : अखेर कोल्हापूरला पुराने वेढलं! तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली; 'पंचगंगेने' इशारा पातळी ओलांडली

वडेट्टीवार काय म्हणाले?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबादिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळाला तर ठेंगा... देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? असा सवाल करीत केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे पुन्हा सिद्ध झाले, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जातोय

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणार आणि बजेटमध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करणार? भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं? टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली तर गुजरात किंवा इतर राज्य, महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल, असे वडेट्टीवार म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply