Mumbai : आदिवासी मुलींची विक्री, लग्नाचे आमिष दाखवून सौदा; ठाणे अन् पालघरमधील भयंकर प्रकार उघड

Mumbai : ग्रामीण भागात आदिवासी मुलींची लग्नाच्या नावाखाली विक्री होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. अशातच ठाणे पालघर जिल्ह्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे. ग्रामीण भागात अल्पवयीन आदिवासी मुलींची लग्नाच्या नावाखाली विक्री होत असल्याचं उघडकीस झालं. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजाच्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीनं लग्न लावून देण्यात आले. तिची पन्नास ते सव्वा लाखापर्यंत विक्री करण्यात आली. लग्नानंतर तिचा शारीरिक तसेच मानसिक छळ सुरू झाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली.

मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी वाडा पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांकडून पुढील तपास सुरू. तर, दुसरी घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात घडली आहे. एका अल्पवयीन मुलीची ७५ हजारात विक्री केली. तसेच तिला अहिल्यानगरात लग्न लावण्यासाठी घेऊन गेले.

तेव्हा श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना कळवले. किन्हवली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, 'अल्पवयीन आदिवासी मुलींची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. ठाणे आणि पालघर भागातून हे प्रकरण उघडकीस आलं. लग्नाच्या नावाखाली एजंटद्वारे मुलींची विक्री केली जाते. या गोष्टीला आळा घालण्यासाठी शासनाने पावले उचलावीत', अशी मागणी विवेक पंडित यांनी केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *