
What is the schedule for the Bandra–Ajmer Weekly Superfast Express : मुंबईहून गुजरात, जयपूर अन् अजमेरला जाणाऱ्यांसाठी रेल्वेने खास गिफ्ट दिलेय. वांद्रे रेल्वे स्थानकातून अजमेरसाठी खास साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात आली आहे. अजमेरहून प्रत्येक रविवारी ही एक्सप्रेस वांद्रेसाठी सुटेल. तर वांद्रेहून प्रत्येक सोमवारी अजमेरसाठी एक्सप्रेस धावणार आहे. गुजरात अन् राजस्थानला जाणाऱ्या अनेक प्रवाशांना या एक्सप्रेस ट्रेनचा फायदा होणार आहे. रेल्वेकडून एक्सवर ट्रेनचे वेळेपत्रक जारी केले आहे.
वांद्रे - अजमेर ट्रेनचे वेळापत्रक काय ? When will the special Bandra–Ajmer train run from Mumbai?
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस - अजमेर दरम्यान विशेष साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 09622 वांद्रे टर्मिनस - अजमेर सुपरफास्ट विशेष रेल्वे प्रत्येक सोमवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी 09:35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 08:50 वाजता अजमेरला पोहोचेल. ही रेल्वे १४ जुलै ते २९ सप्टेंबरपर्यंत चालेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 09621 अजमेर - वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट विशेष रेल्वे प्रत्येक रविवारी अजमेर येथून सकाळी 06:35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 04:15 वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. ही रेल्वे १३ जुलै ते २८ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक आठवड्याला धावेल.
|
|
वांद्रे अजमेर ट्रेन कुठे कुठे थांबणार ? Which stations does the Bandra–Ajmer train stop at?
वांद्रे स्थानक ते अजमेर यादरम्यान रेल्वेकडून साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस बोरिवली, वापीर, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, विक्रमगड अलोट, भिवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवई माधवपूर, जयपूर, किशनगड स्टेशनवर थांबेल. तिकिटासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
वांद्रे ते अजमेर यादरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये एसी 2-टियर, एसी 3-टियर, एसी 3-टियर (इकॉनॉमी), स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास बोगी असतील. ट्रेन क्रमांक 09622 साठी बुकिंग 12 जुलैपासून आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल. या साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेनबाबत आणखी माहिती जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

