Ghatkopar Station : लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाने जीव गमावला, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

Mumbai : मध्य रेल्वे घाटकोपरमध्ये लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घाटकोपरमधील फ्लॅटफॉर्म नंबर एकवर उभा असतााना या प्रवाशाला चक्कर आली. त्यानंतर हा प्रवासी एक नंबरच्या फ्लॅटफॉर्म आणि लोकलमध्ये पडला. प्रवासी लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्याची माहिती मिळताच आरपीएफ स्टाफ आणि प्रवासी मदतीला धावले. प्रवाशाला फटीतून बाहेर काढून रुगणालय दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी प्रवाशाला मृत घोषित केले.

घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकल आणि फलाटामध्ये अडकून एका प्रवासाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संजय जगजप्पा मातंगे असे या प्रवाशाचे नाव आहे. संजय हे फलाटावर लोकलची वाट पाहत उभे होते. त्याचवेळी ७.५८ ची ठाणे लोकल फलाटावर आली. लोकल आल्यानंतर अचानक संजय यांना चकर आली आणि ते थेट लोकलवर आदळून लोकल आणि फलाटाच्या फटीत अडकले.

Navi Mumbai : नवी मुंबईत कंपनीत गॅस गळती; २५ महिला कामगार बेशुद्ध, अनेकांची प्रकृती चिंताजनक

या घटनेनंतर आरपीएफ पोलिसांनी संजय यांना फटीतून बाहेर काढले. त्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत घोषित केले. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे ठाणे दिशेने जाणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम दिसून आला. या घटनेनंतर फ्लॅटफॉर्वर प्रवाशांची एकच गर्दी झाली.

Ghatkopar Railway station : दुर्दैवी! मुंबईच्या घाटकोपरमध्ये लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू

नेमकं काय घडलं?

घाटकोपर रेल्वे स्टेशनवर सायंकाळी 07: 44 वाजता परेलवरून ठाण्याला जाणारी लोकल घाटकोपरला 7: 58 वाजता पोहोचली. हा प्रवासी फ्लॅटफॉर्म नंबरच्या डब्याच्या शिडी आणि प्लॅटफॉर्ममध्ये पडल्याची माहिती दिली. बदलापूरमधील हा प्रवासी फलाट आणि लोकलमध्ये अडकून जखमी स्थितीत अत्यावस्थ झाल्याने प्रवासी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, होमगार्ड, आरपीएफ स्टाफ घटनास्थळी पोहोचले.

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! माहीममध्ये भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

अपघातानंतर पोलिसांनी स्टेशन मास्तर आणि मोटरमन यांना लोकल हलवू नये, अशा सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी रेल्वे प्रवाशाला प्लॅटफॉर्ममधून रेस्क्यू केले. या प्रवाशाला वाचवण्यासाठी छातीवर सतत पंपिंग केले. मात्र, त्याने हालचाल केली नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेची वाट न पाहता रिक्षाने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रवाशाला मृत घोषित केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply