Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात,२ सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू

Mumbai Pune Expressway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचा (Two brothers dead in bike crash) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. चिंचवड (Chinchwad road accident ) येथे काम करणारे हे दोन्ही भाऊ कामावरून सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे एकाच दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळी काळाने घाला घातला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे योगेश राजोरिया (वय ३४) आणि दीपक राजोरिया (वय ३१), रा. पारशीचाळ, देहूरोड अशी आहेत.

योगेश आणि दीपक हे चिंचवड येथे कामाला होते. नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर दोघेजण चुकाकीवरून घराकडे परत येत होते. त्यावेळी गार्डनर सिटी गेटजवळ दुचाकी घसरली अन् भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर आणि भयंकर होता की, दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये दीपक आणि योगेश या दोन सख्ख्या भावांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

Mumbai AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार, आजपासून मध्य रेल्वेवर धावणार १४ नव्या एसी लोकल;

वाचा संपूर्ण वेळापत्रक

अपघाताची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आले. देहूरोड पोलीस अपघाताच्या कारणांचा अधिक तपास करत आहेत.दरम्यान, दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे पारशीचाळ आण देहूरोड येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजोरिया कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय.

दुर्दैवी अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दोन सख्ख्या भावांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय. पोलिस अपघाताच्या कारणांचा सखोल तपास करत असून, रस्त्याच्या परिस्थितीसह अन्य बाबींचीही चाचपणी करत आहेत. या दु:खद घटनेने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply