
Mumbai : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-आमणे टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या अखेरची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करून एप्रिलअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) नियोजन आहे. असे असताना लोकार्पण होण्याआधीच इगतपुरी – आमणे महामार्गावरून वाहने धावू लागली आहेत. यामुळे अपघातांची भितीही व्यक्त होत असून अनधिकृत वाहनांना रोखण्याचे आव्हानही एमएसआरडीसीसमोर उभे ठाकले आहे.
चारचाकीसह ट्रकही धावतात
एमएसआरडीसीच्या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गातील नागपूर – इगतपुरी महामार्ग सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. तर इगतपुरी – आमणे या शेवटच्या ७६ किमी लांबीच्या महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या अंतिम कामे सुरू असून ही कामे १५-२० दिवसात पूर्ण करून एप्रिलअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. पण हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याआधीच इगपुरी – आमणे महामार्गावरून, महामार्गातील पाच बोगद्यांतून वाहने धावू लागली आहेत.
या महामार्गाचा आसपासच्या गावातील वाहनचालकांपासून ते मुंबईतून, इतर ठिकाणाहून येणाऱ्या वाहनचालकांकडून सर्रास वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चारचाकी वाहने आणि ट्रकही अनधिकृतपणे महामार्गावरून जात आहेत. रस्ता वाहतुकीसाठी खुला नसताना वाहने धावत असल्याने अपघातांची भिती निर्माण झाली आहे. तर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
|
Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला? |
अनधिकृत वाहनांना प्रवेशबंदी
इगतपुरी – आमणे महामार्गावर अनधिकृतपणे वाहने धावत असल्याची माहिती समोर आल्यानंतर अखेर आता एमएसआरडीसीला जाग आली आहे. एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला आहे. स्थानिक मंडळी जबरदस्तीने, सुरक्षा रक्षकांवर अरेरावी करत महामार्गांवरून प्रवास करत आहेत. याची गंभीर दखल घेत महामार्ग पूर्णत: वाहनांसाठी बंद करण्याचे आदेश मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तर वाहनांविरोधात कारवाई करण्याचेही निर्देश दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, पाचपैकी सर्वात मोठ्या बोगद्याला प्रवेशद्वार असून हे प्रवेशद्वार आता बंद करण्यात आले आहे. मात्र उर्वरित चार छोट्या बोगद्यांना प्रवेशद्वार नाही. त्यामुळे या बोगद्यातून आणि उर्वरित महामार्गावरून स्थानिकांच्या वाहनांसह इतर वाहनांची वर्दळ सुरूच राहण्याची शक्यता आहे. या वाहनांना रोखणे अवघड असल्याचे एमएसआरडीसीतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता इगतपुरी – आमणे टप्प्यात अनधिकृतपणे धावणाऱ्या वाहनांना एमएसआरडीसी कसे रोखणार असा प्रश्न आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


