
Mumbai : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास १ एप्रिलपासून महागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावरील पथकरात १९ टक्क्यांची वाढ केली असून ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे सध्या नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना, चारचाकी वाहनांना १०८० रुपये पथकर मोजावा लागतो तेथे आता १ एप्रिलपासून १२९० रुपये पथकरापोटी खर्चावे लागणार आहेत.
एमएसआरडीसीकडून मुंबई ते नागपूर प्रवास केवळ आठ तासात करता यावा यासाठी ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे. त्यातील नागपूर ते इगतपुरी दरम्यानचा महामार्ग सध्या सेवेत दाखल असून इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा येत्या काही दिवसात वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास मुंबई ते नागपूर अंतर आठ तासात पार करता येणार आहे. मात्र या अतिजलद प्रवासासाठी वाहनचालक-प्रवाशांना पथकर मोजावा लागतो.
त्यात आता आणखी वाढ झाल्याने प्रवासी आणि वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एमएसआरडीसीने पथकरात १९ टक्क्यांची वाढ केली आहे. ती १ एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यानुसार आता चारचाकी, हलक्या वाहनांना प्रति किमी २.०६ रुपये, मिनी ट्रक, बससाठी प्रति किमी ३.३२ रुपये, अवजड वाहनांसाठी प्रति किमी १०.९३ रुपये तर अतिजड वाहनांसाठी १३.३० रुपये प्रति किमी असे पथकर दर आकारण्यात येणार आहेत.
|
|
पथकरातील दरवाढीनुसार नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना १०८० रुपयांऐवजी १२९० रुपये तर हलक्या व्यवासायिक, मिनी बससाठी १७४५ रुपयांऐवजी २०७५ रुपये पथकर भरावा लागेल. बस, दोन आसांच्या ट्रकसाठी ३६५५ रुपयांऐवजी ४३५५ रुपये आणि तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी ३९९० रुपयांऐवजी ४७५० रुपये पथकर भरावा लागेल. अवजड बांधकाम यंत्रसामग्रीसाठी ५७४० रुपयांऐवजी आता ६८३० रुपये तर अतिअवजड वाहनांनासाठी ६९८० रुपयांऐवजी ८३१५ रुपये पथकर भरावा लागेल. हे दर ३१ मार्च २०२८ पर्यंत लागू असतील.
मुंबई ते नागपूर प्रवासासाठी १४४५ रुपये पथकर
समृद्धी महामार्गातील शेवटचा इगतपुरी ते आमणे टप्पा पूर्ण झाला आहे. आता केवळ लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. या टप्प्याचे लोकार्पण झाले की मुंबईकरांचे मुंबई ते नागपूर अंतर केवळ आठ तासात पार करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र यासाठी चारचाकी वाहनांना १४४५ रुपये इतका पथकर मोजावा लागणार आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

