Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पश्चिम उपनगरात पाईपलाईन फुटली, पाणीपुरवठा बंद

 

Mumbai Water Cut News Update in Marathi : मुंबईकरांवर आज पाणीबाणीचे संकट ओढावलेय. शुक्रवारी मलाड पश्चिम परिसरात जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम येथे राहणाऱ्या नागरिकांना पाणीबाणीला सामोरं जावे लागत आहे. दरम्यान, फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचं काम वेगात सुरू आहे. आज हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रविवारी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. तर सोमवारपासून पाणी सुरूळीत होईल, असे सांगण्यात येत आहे.

मालाड पश्चिम परिसरातील लिबर्टी जलबोगदा येथे १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याचे पालिकेला निदर्शनास आले आहे. या जलवाहिनीतून पाणी गळती सुरू झाल्यामुळे दुरुस्तीच्या कारणास्तव मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा मैदानात, उपोषणाचं अस्त्र उगारलं, फडणवीसांचं नाव घेत म्हणाले...

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी रात्री १०.३० वाजता हाती घेण्यात आले आहे. तसेच जलवाहिनी दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिम आणि गोरेगाव पश्चिम परिसरातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवार बंद राहील.

 

कोण कोणत्या विभागात आज पाणी नाही -

मालाड पश्चिमेकडील अंबुजवाडी, आजमी नगर, जनकल्याण नगर येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

गोरेगाव पश्चिम येथील उन्नत नगर, बांगुर नगर, शास्त्री नगर, मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगर, जवाहर नगर, भगतसिंग नगर, राम मंदिर मार्ग येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply